विरोधकांनी मांडलेल्या कोणत्याही विषयावर चर्चा करायला सरकार तयार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी आज स्पष्ट केलं. ते नागपुरात विधिमंडळाच्या पायऱ्यावर बातमीदारांशी बोलत होते. सरकार कुठलीही माहिती लपवून ठेवणार नाही, असं ते म्हणाले.
सुधीर मुनगंटीवार यांना मंत्रिमंडळात स्थान दिलं नसल्याबाबत विचारलं असता त्यांनी सांगितलं की पक्ष आणि सरकार हे दोन्ही महत्त्वाचे असतात. काहींना पक्षाची जबाबदारी देण्यासाठी मंत्रिमंडळात सामावून घेतलं जात नाही. असं फडनवीस म्हणाले.