डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

September 19, 2024 1:57 PM

printer

मुंबईमध्ये प्रदुषण कमी झाल्ल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन

मुंबईमध्ये डीप क्लिन ड्राईव्हच्या माध्यमातून रस्ते साफ करणं, रस्ते झाडणे, पाण्याने रस्ते धुणं हे काम सुरू असून यामुळे मुंबईचं प्रदुषण कमी झालं असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ‍ शिंदे यांनी म्हटलं आहे. ‘स्वच्छता ही सेवा’ या  राज्यस्तरीय अभियानाची सुरुवात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मुंबईत गिरगाव चौपाटीवरून झाली.

 

हे अभियान २ ऑक्टोबरपर्यंत चालणार असून राज्यातल्या नागरी आणि ग्रामीण भागात ‘स्वभाव स्वच्छता – संस्कार स्वच्छता’ ही संकल्पना राबविण्यात येणार आहे. तसंच, ‘एक पेड माँ के नाम’ या उपक्रमांअंतर्गत वृक्षारोपण आणि सौंदयीकरण करण्याचे काम सुरू असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.