नवोन्मेष हा केवळ बुद्धिमत्ता आणि संशोधनाचा उत्सव नसून लोकांचं जगणं वेगळ्या पातळीवर नेण्याचा मार्ग असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. मुंबईत श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी विद्यापीठातल्या इनोव्हेशन महाकुंभाचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. नवनवीन कल्पना आणि नवीन संशोधनाला उद्योजकतेमधे रुपांतरित करण्यासाठी राज्यसरकारने विशेष स्टार्ट अप धोरण जाहीर केलं असून स्टार्टअप्सना प्रोत्साहन देण्याकरता विशेष निधी उभारला आहे असं ते म्हणाले. राज्याचे कौशल्यविकास मंत्री मंगलप्रभात लोढा कार्यक्रमाला उपस्थित होते.
इनोव्हेशन महाकुंभाच्या निमित्तानं आयोजित नवोन्मेष स्पर्धेच्या विजेत्यांना, फडणवीस यांच्या हस्ते पारितोषिकं प्रदान करण्यात आली.