डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

September 19, 2024 10:23 AM | CM Eknath SAhinde

printer

सेमी कंडक्टर प्रकल्पासाठी राज्य सरकार मदत करत असल्याचं मुख्यमंत्र्यां प्रतिपादन

विकसित भारतात महाराष्ट्र उद्योगमित्र राज्य असून, सेमी कंडक्टर प्रकल्पासाठी राज्य सरकार मदत करत असल्याचं प्रतिपादन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल नवी मुंबईत केलं. राज्यातल्या पहिल्या सेमी कंडक्टर प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते काल झालं त्यावेळी ते बोलत होते.

 

हा प्रकल्प दोन टप्यात होणार असून इटली आणि फ्रान्स सरकारचा यामध्ये २७ टक्के वाटा आहे. प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात २४ हजार ५३८ कोटी रुपये गुंवतणूक करण्यात येणार आहे. दोन्ही टप्प्यात महाराष्ट्रातील एकंदर गुंतवणूक ३६ हजार ५७३ कोटी रुपये असेल.