भारताची न्यायव्यवस्था विलक्षण आव्हानात्मक परिस्थितीत आहे आणि त्यात मोठ्या सुधारणांची गरज आहे, असं प्रतिपादन सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांनी आज केलं. हैदराबादमध्ये नालसार विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात ते बोलत होते.
वर्षानुवर्षं चालणारे खटले आणि तुरुंगात खितपत पडलेल्या आरोपींची अवस्था ही चिंतेची बाब असल्याचंही ते म्हणाले. न्यायमूर्ती गवई यांनी भावी कायदेतज्ज्ञांना जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे न्यायव्यवस्थेत सुधारणा करण्याचं आवाहन केलं. परदेशात शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्तीचा लाभ घेऊन पालकांवर आर्थिक बोजा टाकू नका, असा सल्लाही त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.