नागपूरच्या महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाच्या नवीन प्रशासकीय इमारतीचं उद्घाटन आज सरन्यायाधीश आणि विद्यापीठाचे कुलपती न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या हस्ते झालं. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांच्यासह अनेक मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते. या विद्यापीठाची जागतिक स्तरावर गुणवत्तापूर्ण ओळख निर्माण होईल असा विश्वास न्यायमूर्ती गवई यांनी व्यक्त केला. राज्य सरकारनं या इमारतीसाठी ५०० कोटी रुपये निधी उपलब्ध करुन दिला आहे. विद्यापीठाच्या ग्रंथालयाच्या इमारतीचं भूमीपूजन देखील या कार्यक्रमात झालं.
Site Admin | June 29, 2025 7:49 PM
सरन्यायाधीश आणि विद्यापीठाचे कुलपती न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या हस्ते नागपूरच्या महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाच्या नवीन प्रशासकीय इमारतीचं उद्घाटन
