न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर यांनी आज मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून शपथ घेतली. राजभवन इथं झालेल्या या कार्यक्रमात राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी न्यायमूर्ती चंद्रशेखर यांना पदाची शपथ दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासह इतर मंत्री, मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आणि अधिकारी यावेळी उपस्थित होते.
मुंबई उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती आलोक आराधे यांची सर्वोच्च न्यायालयात नियुक्ती झाल्यानंतर न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर मुंबई उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायाधीश म्हणून काम करत होते. यापूर्वी त्यांनी झारखंड उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायाधीश म्हणूनही काम पाहिलं आहे. त्यानंतर ते राजस्थान न्यायालयात न्यायाधीश म्हणून कार्यरत होते. २१ जुलै रोजी त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून शपथ घेतली.