डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

October 23, 2024 2:47 PM

printer

जया शेट्टी खून प्रकरणात छोटा राजन याला जामीन मंजूर

 
हॉटेल व्यावसायिक जया शेट्टी खून प्रकरणात कुख्यात गुन्हेगार छोटा राजन याला मुंबई उच्च न्यायालयानं आज जामीन मंजूर केला. या वर्षी ३० मे रोजी विशेष मोक्का न्यायालयानं राजनसह इतरांना दोषी ठरवून त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.
 
 
आज, न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि न्यायमूर्ती पृथ्विराज चव्हाण यांच्या पीठानं राजन याला जामीन दिला आणि मोक्का न्यायालयाच्या निर्णयाच्या विरोधातल्या याचिकेवर निर्णय होईपर्यंत त्याच्या जन्मठेपेच्या शिक्षेला स्थगिती दिली. ही राजनची दुसरी जन्मठेप असून पत्रकार ज्योतिर्मोय डे यांच्या हत्येप्रकरणी तो जन्मठेपेत आहे.