छत्तीसगडच्या गरियाबंद जिल्ह्यात आज ९ नक्षलवाद्यांनी पोलिसांसमोर शरणागती पत्करली. त्यात ६ महिलांचाही समावेश आहे. या नऊ जणांवर एकूण ४८ लाख रुपयांची बक्षिसं ठेवण्यात आली होती. पोलीस महासंचालकांच्या आवाहनानंतर त्यांनी शरणागती पत्करली असून आज झालेल्या कार्यक्रमात या नक्षलवाद्यांनी त्यांच्याकडील अत्याधुनिक बंदुका आणि इतर शस्रं पोलिसांकडे सुपूर्द केली. या नक्षलवाद्यांच्या शरणागतीमुळे आता जिल्ह्यात एकही नक्षलवादी सक्रीय नसल्याची माहितीही पोलीस महासंचालकांनी दिली.
Site Admin | January 19, 2026 8:07 PM
छत्तीसगडच्या गरियाबंद जिल्ह्यात ९ नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण