डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

छत्तीसगढ महापालिका निवडणूकीत भाजपाचा ऐतिहासिक विजय

छत्तीसगढमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी झालेल्या निवडणूकीत भाजपानं तिथल्या दहाही महानगरपालिकेच्या महापौरपदावर विजय मिळवला आहे. छत्तीसगढमधल्या १० महानगरपालिका, ४९ नगरपरिषदा, ११४ नगरपंचायती आणि १७३ नगरपालिकांसाठी ११ फेब्रुवारीला मतदान झालं होतं. त्याचे निकाल आज जाहीर झाले. महापालिकेच्या बहुतांश प्रभागांमध्येही भाजपाच्या उमेदवारांनी विजय मिळवला आहे किंवा आघाडी घेतली आहे. भाजपानं ३५ नगरपरिषदा आणि ८१ नगरपंचायतींच्या सभापतीपदाची निवडणूकही जिंकली आहे.

 

या निवडणुकीत काँग्रेसनं आठ नगरपरिषदा आणि २२ नगरपंचायतींच्या सभापतीपदावर विजय मिळवला, आम आदमी पार्टीनं एका नगरपरिषदेत आणि बहुजन समाज पक्षानं एका नगरपंचायतीच्या सभापतीपदाची निवडणूक जिंकली.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.