छत्तीसगढमधे एकूण २९ लाख रुपयांचं बक्षीस असलेल्या २५ माओवाद्यांचं आत्मसमर्पण

छत्तीसगढच्या बिजापूर जिल्ह्यात २५ माओवाद्यांनी आत्मसमर्पण केलं. या माओवाद्यांपैकी तिघांवर प्रत्येकी आठ लाखाचं, एकावर ३ लाखांचं तर दोन माओवाद्यांवर प्रत्येकी १ लाखांचं पारितोषिक असं एकूण २९ लाख रुपयांचं बक्षीस जाहीर झालं होतं. केंद्रीय राखीव पोलीस दलाचे जिल्हा पोलिस अधिक्षक आणि पोलिस महासंचालक यांच्या समोर त्यांनी आत्मसमर्पण केलं. या माओवाद्यांना छत्तीसगढ राज्यसरकारने प्रत्येकी २५ हजार रुपयांचा पुनर्वसन निधी दिला आहे.