September 28, 2025 7:40 PM

printer

छत्तीसगडमध्ये कांकेर जिल्ह्यात झालेल्या चकमकीत तीन माओवादी ठार

छत्तीसगडमध्ये कांकेर जिल्ह्यात तिरियारपाणीच्या जंगलात आज सुरक्षा दलांबरोबर झालेल्या चकमकीत तीन माओवादी ठार झाले. त्यांच्यावर एकूण १४ लाख रुपयांचं बक्षीस होतं. घटनास्थळावरून बंदुका आणि इतर साहित्य जप्त करण्यात आलं आहे. या भागात सात ते आठ माओवादी लपून बसल्याची माहिती जिल्हा राखीव पोलिसांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे शोधमोहीम राबवल्यानंतर माओवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार केल्याने ही चकमक सुरू झाली. ठार झालेल्या माओवाद्यांमध्ये श्रवण मडकम उर्फ विश्वनाथ याचा समावेश असून त्याच्यावर ८ लाख रुपयांचं बक्षीस होतं.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.