छत्तीसगडच्या गरियाबंद जिल्ह्यात नऊ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं. यातल्या एका महिलेनं जिल्ह्यातल्या इतर नक्षलवाद्यांना शरण येण्याचं आवाहन केलं आहे. जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक वेदव्रत सिरमौर यांनीही या परिसरातल्या नक्षलवाद्यांना आत्मसमर्पण करण्याचं आवाहन केलं आहे. समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील व्हा आणि सरकारच्या पुनर्वसन धोरणाचा लाभ उठवा, असं ते म्हणाले.
छत्तीसगढमध्ये गेल्या दोन वर्षांत दोन हजारहून अधिक नक्षलवाद्यांनी शस्त्रं खाली ठेवून मुख्य प्रवाहधारित सामील व्हायचा निर्णय घेतला आहे.