छत्तीसगडमधे बिजापूर जिल्ह्यात कालपासून सुरक्षा दलं आणि माओवाद्यांमधे सुरु असलेल्या चकमकीत मारल्या गेलेल्या माओवाद्यांची संख्या सहावर पोचली आहे. त्यापेकी चार जणांची ओळख पटली असून त्यात नॅशनल पार्क क्षेत्र समितीचा विभागीय समिती सदस्य दिलीप बेडजा याचा समावेश आहे.
चकमकीच्या ठिकाणावरुन सहा रायफल्स सुरक्षा दलांनी हस्तगत केल्या आहेत.
दरम्यान,माओवाद्यांनी हिसाचार थांबवावा आणि विकासाच्या मुख्य प्रवाहात सामील व्हावं, असं आवाहन छत्तीसगडचे उपमुख्यमंत्रीविजय शर्मा यांनी केलं आहे. त्यांच पुनर्वसन करुन त्यांना न्याय, सुरक्षा, आणि सन्मान दिला जाईल, अशं आस्वासनही त्यांनी दिलं आहे.