December 22, 2025 1:27 PM | Chhattisgarh

printer

छत्तीसगढमध्ये नक्षल्यांचा हत्यारांचा कारखाना उद्ध्वस्त

छत्तीसगढच्या सुकमा जिल्ह्यात सशस्त्रदलांनी मोठी कारवाई करून नक्षलवाद्यांचा एक शस्त्रास्त्रांचा कारखाना उद्ध्वस्त केला. या कारवाईदरम्यान ८ सिंगल शॉट रायफल्स, मोठ्या प्रमाणात स्फोटकं आणि शस्त्रास्त्रं तयार करण्यासाठीची उपकरणं आणि सामान जप्त करण्यात आलं. केंद्रीय राखीव पोलीस दल आणि जिल्हा पोलीस दलानं गुप्त माहितीच्या आधारे मीनागट्टा परिसरातलं जंगल आणि डोंगराळ भागात शोधमोहीम राबवली आणि हा कारखाना शोधून उद्ध्वस्त केला.