December 18, 2025 2:51 PM | Chhattisgarh

printer

छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलांच्या कारवाईत ३ नक्षली ठार

छत्तीसगडमधल्या सुकमा जिल्ह्यात सुरक्षा दलांच्या कारवाईत आज तीन नक्षली मारले गेले. गोलापल्ली पोलीस ठाणे परिसरात आज सकाळी सुरक्षा दलाचे जवान आणि नक्षलींमधे चकमक सुरू झाली, यात तीन नक्षलींचा मृत्यू झाला. छत्तीसगड राज्यात या वर्षभरात २८४ नक्षली चमकमीकत मारले गेल्याचं सुरक्षा दलानं म्हटलं आहे.