छत्तीसगडमध्ये बिजापूर जिल्ह्यात चकमकीत मारले गेलेल्या माओवाद्यांची संख्या १८ वर पोहोचली आहे. त्यात ९ महिलांचा समावेश आहे. चकमकीच्या ठिकाणाहून एक एलएमजी, एके ४७ रायफल, एसएलआर, इन्सास रायफल, 303 बोअर गन, एक रॉकेट लॉन्चर, तसंच बॉम्बगोळे, रेडिओ संच, स्कॅनर्स, माओवादी साहित्य आणि मोठ्या प्रमाणात स्फोटक साहित्य, सुरक्षा दलांनी जप्त केलं आहे.
या चकमकीत शहीद झालेल्या तीन सुरक्षा जवानांना आज बिजापूरमधल्या नव्या पोलीस वसाहतीत आदरांजली वाहण्यात आली. जखमी झालेल्या दोन जवानांना रायपूरमधल्या रूग्णालयात उपचार सुरू आहेत.