March 25, 2025 8:17 PM | Chhattisgarh

printer

छत्तीसगडमध्ये झालेल्या चकमकीत ३ माओवादी ठार

छत्तीसगडमध्ये दंतेवाडा आणि बिजापूर जिल्ह्यांच्या सीमावर्ती भागात आज सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत तीन माओवादी ठार झाले. यांपैकी एक जण दंडकारण्य विशेष विभागीय समितीचा सदस्य म्हणून कार्यरत होता. सुरक्षा दलाला मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई केल्याचं दंतेवाडाचे पोलीस अधीक्षक गौरव राय यांनी सांगितलं.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.