डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

छत्रपती शिवाजी महाराज महावारसा पुरस्कार जाहीर

राज्य सरकारनं यंदाचा छत्रपती शिवाजी महाराज महावारसा पुरस्कार युनेस्कोमधले भारताचे प्रतिनिधी विशाल शर्मा आणि अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण संघाला जाहीर केला आहे. ३ लाख रुपये, मानचिन्ह, प्रमाणपत्र असं या पुरस्काराचं स्वरुप आहे. हे या पुरस्कारांचं पहिलंच वर्ष आहे. ऐतिहासिक वारसा स्थळांचं जतन संवर्धन करणाऱ्या आणि जागतिक स्तरावर त्यांची ओळख निर्माण करणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार दिला जाणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांना जागतिक वारसा मिळवून देण्याच्या कामात विशाल शर्मा यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिलं होतं.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा