छत्रपती शिवाजी महाराज भारत गौरव पर्यटन ट्रेनला प्रारंभ

भारतीय रेल्वे खानपान आणि पर्यटन महामंडळ अर्थात आयआरटीसीटीनं ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशाला उजाळा देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनकार्याशी संबंधित भेट देणारी, ‘छत्रपती शिवाजी महाराज’ ही  विशेष सर्किट गाडी सुरु केली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे छत्रपती शिवाजी महाराज भारत गौरव पर्यटन ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मंत्री आशिष शेलार आणि इतर मान्यवर तसेच या पहिल्या गाडीचे प्रवासी उपस्थित होते. ही गाडी आज पहिल्या दिवशी रायगड किल्ला येथे भेट देणार आहे.त्यानंतर शिवनेरी किल्ला, प्रतापगड किल्ला, पन्हाळा किल्ला, लाल महाल, कसबा गणपती, शिवसृष्टी या ठिकाणांना भेट देणार आहे. या ५ दिवसांच्या विशेष प्रवासात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनाशी संबंधित महत्त्वाच्या ऐतिहासिक स्थळांना भेट, इतिहासावर आधारीत कार्यक्रम असणार आहेत.