राजकोट किल्ल्यावर उभारलेल्या शिवरायांच्या पुतळ्याचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पूजन

सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण इथे राजकोट किल्ल्यावर उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूजन केलं. या सोहळ्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार नारायण राणे, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. शिवरायांचा पुतळा पुन्हा एकदा त्याच तेजाने, त्याच स्वाभिमानाने आणि त्याहीपेक्षा भव्यतेने उभा राहिला आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री फडणवीस यांनी या सोहळ्यानंतर दिली.

 

कोकण किनारपट्टीवर येणाऱ्या विविध वादळांची तीव्रता लक्षात घेऊन या पुतळ्याची रचना करण्यात आली आहे. या पुतळ्याच्या परिसर लवकरच योग्य प्रकारे विकसित करण्यात येईल, असंही फडणवीस यावेळी म्हणाले. 

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.