डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

छत्रपती संभाजीनगरमध्ये बांगलादेशी शोधमोहीम राबवण्याचा पालकमंत्र्यांचा इशारा

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात बांगलादेशी नागरिक शोधमोहीम राबवणार असल्याचा इशारा, पालकमंत्री संजय शिरसाट यांनी दिला आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी काल सिल्लोड इथं उपविभागीय अधिकारी लतीफ पठाण यांची भेट घेऊन बांगलादेशी घुसखोर या विषयी चर्चा केली, या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देतांना शिरसाट यांनी, येत्या दोन आठवड्यात ही मोहीम राबवली जाणार असल्याचं सांगितलं…

 

पोलीस, कलेक्टर आणि ग्रामीण एसपी यांची संयुक्त टीम बनवून आठवडा किंवा पंधरवडामध्ये डोअर टू डोअर जाऊन या सगळ्या गोष्टींची आम्ही माहिती घेणार आहोत. आधार कार्ड बनवणारी, इलेक्शन कार्ड देणारी सुद्धा टोळी या शहरात कार्यरत आहे. या शहरामध्ये, या जिल्ह्यामध्ये बांगलादेशी घुसखोर आहेत, त्यांना पकडण्याची मोहीम आम्ही आता सुरू करणार आहोत. आणि एकही बांगलादेशी या शहरामध्ये राहणार नाही याची काळजी आम्ही घेणार आहोत.