छत्रपती संभाजीनगर : घाटी रुग्णालयात परिचारिकांचं कामबंद आंदोलन

छत्रपती संभाजीनगर इथल्या घाटी रुग्णालयात परिचारिकांनी आज विविध मागण्यांसाठी कामबंद आंदोलन सुरु केलं आहे. पदोन्नतीसह, परिचारिकांना मिळणारे भत्ते विशेषतः परिचर्या भत्ता, ग्रामीण रुग्णालयात परिसेविका पद पुनर्जीवित करणं, बंधपत्रित परिचारिकांचा सेवा कालावधी नियमित करणं, बक्षी समिती खंड-२ मध्ये परिचर्या संवर्गावर झालेला अन्याय दूर करणं, परिविक्षा कालावधीसाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेमधून अधिपरिचारिका पद वगळणं, यासह इतर मागण्यांचं निवदेन परिचारिका संघटनेच्या वतीने रुग्णालय प्रशासनाला देण्यात आलं.