कन्या भ्रूण हत्येच्या प्रतिबंधासाठी नागरिकांनी पुढे यावं – छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या गर्भलिंग चाचण्या आणि त्यानंतर होणाऱ्या कन्या भ्रूण हत्येस आळा घालण्यासाठी नागरिकांनी पुढे येण्याचं आवाहन, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केलं आहे. काल यासंदर्भातल्या बैठकीनंतर ते बोलत होते. जिल्ह्यात फिरत्या वाहनांमध्ये गर्भलिंग निदान चाचण्या करणाऱ्या अनधिकृत व्यक्ती वावरत असल्याचं प्रशासनाच्या निदर्शनास आलं असून, त्याबाबत कडक उपाययोजना करण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं. नागरिकांना यासंबंधी काही माहिती मिळाली तर १८ ०० २३३ ४४ ७५ या नि:शुल्क क्रमांकावर माहिती द्यावी, माहिती देणाऱ्याचं नाव गोपनीय ठेवलं जाणार असून, संबंधितांना पारितोषिक दिलं जाणार असल्याचं स्वामी यांनी सांगितलं.