सूर्यपूजेचा उत्सव म्हणून ओळखला जाणाऱ्या छठ उत्सवाचा आज सकाळी उगवत्या सूर्याला प्रार्थना करून, श्रद्धा, भक्ती आणि आनंदाच्या वातावरणात समारोप झाला. महिलांनी नद्या, तलाव आणि जलाशयांमध्ये उभे राहून सूर्यदेवाची प्रार्थना केली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी छठ पूजेत सहभागी झालेल्या सर्वांना शुभेच्छा दिल्या.
छठपूजा हा केवळ धार्मिक विधी नसून आपल्या आस्थेचे, संस्कृतीचे आणि परंपरेचं प्रतीक असल्याचं प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं. संजय निरुपम आणि बिहारी फ्रंटतर्फे जुहू इथं झालेल्या छठपूजेच्या कार्यक्रमात ते आज बोलत होते.