बिहारसह देशभरांत छटपुजेचा उत्साह

सुर्यदेवतेची आराधना करण्याचा, श्रद्धेचा सण म्हणून ओळखला जाणारा छट पूजेचा उत्सव देशाच्या अनेक भागांमध्ये उत्साहानं साजरा केला जात आहे. बिहारमध्ये, गंगा, गंडक, कोसी, महानंदा आणि बागमती यासारख्या नद्यांच्या काठावर तसंच देशभरातील विविध जलाशयातील छठ घाटांवर सूर्यदेवाची प्रार्थना करण्यासाठी भाविक  मोठ्या संख्येनं उपस्थित आहेत. आज अनेक भाविकांनी उगवत्या सूर्याला अर्घ्य देऊन छट महापर्व साजरे केले.