डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याबाबत कोणताही विचार नाही – मंत्री छगन भुजबळ

दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याबाबत सध्यातरी कोणताही विचार नाही, असं राज्याचे अन्न आणि पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. ते आज सकाळी नाशिक इथं वार्ताहरांशी बोलत होते.

सध्या असा कोणाताही विचार नसल्याचं अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी यापूर्वीच स्पष्ट केलं आहे. राज्यात तीन पक्षांचं सरकार आहे, जर तसं काही करायचं असल्यास मित्र पक्षांचा सल्ला घेणं, त्यांना विश्वासात घेणं आणि भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करण्याचा घेतलेला निर्णय योग्यच असल्याचं भुजबळ म्हणाले. विधानसभेत चर्चेत आलेल्या नाशिकमधील हनी ट्रॅप प्रकरणाबाबत बोलताना भुजबळ यांनी या सर्व प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी चौकशी अंतीच खुलासा केलेला असल्याचं नमूद करत नाशिक नाहक बदनाम होत असल्याबद्दल खेद व्यक्त केला.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.