महाराष्ट्र सदन घोटाळ्यात छगन भुजबळ PMLA न्यायालयाकडून दोषमुक्त

नवी दिल्लीतल्या महाराष्ट्र सदन कथित घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री छगन भुजबळ यांना मुंबईतल्या PMLA न्यायालयानं आज दोषमुक्त केलं. नवी दिल्लीत महाराष्ट्र सदन बांधण्यासाठी काढलेला मूळचा खर्चाचा अंदाज नंतर सुमारे चौपट वाढवल्याचा, आणि संबंधित कंत्राटदाराकडून लाच घेतल्याचा आरोप इडी, अर्थात सक्तवसूली महासंचालनालयानं ठेवला होता. २००५-६ मधल्या व्यवहाराचं हे प्रकरण आहे. भुजबळ त्यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री होते. याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं दाखल केलेल्या FIR च्या आधारावर ईडीनं, भुजबळ, त्यांचा मुलगा पंकज, आणि पुतण्या समीर, तसंच इतरांच्या विरोधात मनी लाँड्रिंग कायद्याअंतर्गत हा खटला दाखल केला होता. लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं दाखल केलेल्या विशेष खटल्यातून २००१ मधे या सर्वांची निर्दोष मुक्तता झाली आहे. आज भुजबळ यांचा दोषमुक्ततेसाठीचा अर्ज PMLA न्यायाधीश सत्यनारायण रामजीवन नवंदर यांनी स्विकारल्याचं वकिलानं सांगितलं.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.