डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

December 18, 2024 6:32 PM | Chhagan Bhujbal

printer

ओबीसींच्या हक्कासाठी आपला लढा सुरूच राहणार-छगन भुजबळ

राज्यमंत्रिमंडळात ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना स्थान मिळालं नसल्याबद्दल नाराज झालेल्या समर्थकांची आज नाशिकमधे बैठक झाली.  ओबीसींच्या हक्कासाठी आपला लढा सुरूच राहणार असून गरज पडल्यास रस्त्यावर उतरू असा निर्धार यावेळी छगन भुजबळ यांनी व्यक्त केला. भविष्यातल्या राजकीय वाटचालीबाबात राज्यभरात फिरून कार्यकर्त्यांशी चर्चा करुनच आपली भूमिका स्पष्ट करु, असं ते म्हणाले. या बैठकीला समता परिषदेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी उपस्थित अनेकांनी छगन भुजबळ यांनी दुसऱ्या पक्षात प्रवेश करावा अशी सूचना केली तसेच राष्ट्रवादी आणि अजित पवार यांच्या विरोधात घोषणाही दिल्या.