डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

November 8, 2024 3:43 PM | Chhagan Bhujbal

printer

ईडी कारवाईतून सुटका करण्यासाठी महायुतीमध्ये सामील झाल्याच्या वृत्ताचं भुजबळांकडून खंडन

ईडीच्या कारवाईतून सुटका करून घेण्यासाठी महायुती सरकारमध्ये सामील झाल्याच्या वृत्ताचं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी खंडन केलं आहे. आपण ओबीसी असल्यामुळे आपल्यावर कारवाई झाली असं भुजबळ यांनी म्हटल्याचं वृत्त ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी लिहीलेल्या पुस्तकाचा हवाला देत एका दैनिकाने छापलं आहे. मात्र या दैनिकाबरोबर आपली काही मुलाखत झालेली नाही, आपण कोणतंही पुस्तक लिहीलेलं नाही, तसंच ईडीच्या कारवाईचा आणि आपण सरकारमधे सामील होण्याचा काहीही संबंध नाही असं स्पष्टीकरण भुजबळ यांनी आज नाशिकमधे पत्रकारपरिषदेत दिलं. महाराष्ट्र सदन घोटाळ्यात आपल्याला क्लीन चिट मिळाली तेव्हा आपण महाविकास आघाडी सरकारमधे होतो. तसंच ओबीसी व्यतिरिक्त इतर समाजातल्या राजकीय नेत्यांचीही ईडीमार्फत चौकशी होत आहे, असं ते म्हणाले. विकासाच्या मुद्यावर आपण महायुती सरकारमधे सहभागी झालो आहोत असं त्यांनी स्पष्ट केलं.

 

राजदीप सरदेसाई यांचे पुस्तक निवडणुकीनंतर आपण वाचू आणि त्यानंतर कायदेशीर भूमिका घेऊ असंही भुजबळ यांनी सांगितले.