भारतीय क्रिकेट संघातील नामवंत फलंदाज चेतेश्वर पुजारा याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती जाहीर केली आहे. क्रिकेटने मला अमूल्य संधी, अनुभव, ध्येय आणि प्रेम दिलं तसंच माझ्या राज्य आणि देशाचं प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली अशा शब्दात पुजाराने समाजमाध्यमावर आपल्या भावना व्यक्त केल्या. प्रत्येक चांगल्या गोष्टीला शेवट असतो, निवृत्त होताना माझ्या मनात कृतज्ञतेची भावना आहे, असं पुजारा म्हणाला.
चेतेश्वर पुजाराने १०३ कसोटी क्रिकेट सामन्यात ४३ पूर्णांक ६० च्या सरासरीने ७ हजार १९५ धावा केल्या. यात १९ शतकं आणि ३५ अर्थशतकांचा समावेश आहे. कसोटी क्रिकेटमधे सर्वाधिक धावा करणारा पुजारा हा भारतीय संघातला आठवा खेळाडू आहे. २०१० मधे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात पुजाराने कसोटी पदार्पण केलं होतं, पहिल्याच सामन्यात त्याने ७२ धावांची उत्कृष्ट खेळी केली होती.