डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

December 18, 2024 4:01 PM | FIDE Chess Olympiad

printer

भारताचा बुद्धिबळपटू ग्रँडमास्टर प्रणव व्यंकटेशला युवा रॅपिड आणि ब्लिट्झ स्पर्धांचं विजेतेपद

स्लोव्हेनिया इथं झालेल्या १८ वर्षांखालच्या जागतिक फिडे स्पर्धेत, भारताचा बुद्धिबळपटू ग्रँडमास्टर प्रणव व्यंकटेश यानं युवा रॅपिड आणि ब्लिट्झ या दोन्ही स्पर्धांचं विजेतेपद पटकावलं. रॅपिड प्रकारात त्यानं साडेनऊ गुणांची कमाई करत सुवर्णपदक पटकावलं. या प्रकारात त्याचा रशियाचा प्रतिस्पर्धी अलेक्झांडर यानं ९ गुणांसह रौप्य, तर युक्रेनच्या रोमन यानं साडेसात गुणांसह कांस्य पदक पटकावलं.

 

ब्लिट्झ प्रकारात प्रणवनं एक फेरी शिल्लक असताना साडे एकोणीस गुणांसह सुवर्णपदकाची कमाई केली. या प्रकारात त्याचे रशियाचे प्रतिस्पर्धी दिमित्री यानं साडेपंधरा गुणांसह, तर अलेक्झांडर यानं कांस्य पदक जिंकलं.