बुद्धिबळपटू राहुल व्ही एस याला भारताचा ९१ वा ग्रँडमास्टर होण्याचा मान मिळाला आहे. सहावी आसियान वैयक्तिक अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धा जिंकल्यानं फिडे अर्थात जागतिक बुद्धिबळ महासंघानं राहुलला ग्रँडमास्टर हा किताब दिला आहे.
आठवड्यापूर्वीच चेन्नई मधला इलमपथी ए आर भारताचा ९० वा ग्रँडमास्टर बनला तर त्याआधी एस रोहित कृष्णाला देखील हा किताब मिळाला. बुद्धिबळ क्रमवारीत ग्रँडमास्टर ही सर्वोच्च पदवी आहे.