अग्रमानांकित बुद्धिबळपटू मॅग्नस कार्लसन यानं नॉर्वे चेस २०२५चं विजेतेपद पटकावलं आहे. या स्पर्धेतलं हे त्याचं सातवं विजेतेपद आहे. विद्यमान विश्वविजेता आणि त्याचा कडवा प्रतिस्पर्धी भारताचा ग्रँडमास्टर डी. गुकेश खेळाच्या शेवटच्या टप्प्यावर अडखळल्याने कार्लसनला त्याचा फायदा झाला.
क्लासिक विभागात अंतिम सामन्यात भारताच्या अर्जुन एरिगैसी यानं कार्लसनला बरोबरीत रोखलं होतं. तर स्पर्धेचं जेतेपद पटकावण्यासाठी गुकेशला ग्रँडमास्टर फॅबियानो कॅरुआना याच्याविरुद्धचा सामना जिंकणं गरजेचं होतं. मात्र या सामन्यातल्या शेवटच्या टप्प्यावर गुकेशची खेळी चुकल्याने त्याला पराभव पत्करावा लागला. कॅरुआनाला दुसऱ्या, तर गुकेशला तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं