आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज चेन्नई सुपर किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना

आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज चेन्नई सुपर किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात चेन्नईमध्ये दुपारी साडेतीन वाजता सामना होणार आहे. तर चंदीगढमध्ये राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्स यांच्यात संध्याकाळी ७ वाजता सामना होईल.
दरम्यान काल लखनौ सुपर जायंट्सनं मुंबई इंडियन्सचा १२ धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या लखनौ सुपर जायन्ट्सनं सलामीवीर मिचेल मार्श आणि एडेन मार्कराम यांच्या अर्धशतकांच्या जोरावर निर्धारित २० षटकांत आठ गडी गमावून २०३ धावा केल्या. मुंबई इंडियन्सकडून सूर्यकुमार यादवनं ४३ चेंडूत ६७ धावा केल्या. मात्र मुंबई इंडियन्सला निर्धारित २० षटकांत ५ बाद १९१ धावा करता आल्या. दिग्वेशला सामनावीर घोषित करण्यात आलं.