डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

काश्मिर ते कन्याकुमारी रेल्वेमार्गानं जोडणाऱ्या उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल्वे प्रकल्पाचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

देश आता काश्मीरपासून ते कन्याकुमारीपर्यंत रेल्वे मार्गाने जोडला गेला असून चिनाब आणि अंजी हे पूल जम्मू-काश्मीरसाठी समृद्धीचं प्रवेशद्वार होतील, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणाले. ते आज जम्मू आणि कश्मीरमध्ये ४६ हजार कोटी रुपये खर्चाच्या विविध पायाभूत प्रकल्पांच्या उद्घाटनावेळी बोलत होते. यावेळी त्यांनी उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल्वे प्रकल्पाचं राष्ट्रार्पणही केलं. या प्रकल्पांतर्गत येणाऱ्या आणि जगातला सर्वात उंच रेल्वे पूल असलेल्या चिनाब पुलाचं उद्घाटन केलं.

 

तसंच, देशातला सर्वात उंचावरचा केबलवरचा पूल असलेल्या अंजी पुलाचं उद्घाटनही प्रधानमंत्र्यांच्या हस्ते झालं. जम्मू काश्मीरमधे सुरू होणारे विकास प्रकल्प राज्याच्या विकासाला नवीन गती देतील, असंही प्रधानमंत्री यावेळी म्हणाले. या कार्यक्रमात त्यांनी रेल्वे प्रकल्पात आणि चिनाब पूल निर्मितीत सहभागी कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. काश्मीरच्या भूमीवर झालेल्या पहलगाम हल्ल्याविषयी बोलताना प्रधानमंत्री म्हणाले. तत्पूर्वी, प्रधानमंत्र्यांनी कटरा इथं श्री माता वैष्णोदेवी-श्रीनगर वंदे भारत गाडीला हिरवा झेंडा दाखवला. त्यानंतर त्यांनी शालेय विद्यार्थ्यांबरोबर गाडीने प्रवास केला.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.