चीनचे ख्यातनाम भौतिकशास्त्रज्ञ आणि नोबेल पारितोषिक विजेते चेन निंग यांग यांचं आज बीजिंग इथं वार्धक्यानं निधन झालं. ते १०३ वर्षांचे होते. १९५४ मध्ये, त्यांनी अमेरिकेचे भौतिकशास्त्रज्ञ रॉबर्ट मिल्स यांच्यासोबत समीकरणांचा एक संच तयार केला होता. त्यांनी मांडलेली समीकरणं कालांतरानं भौतिकशास्त्राच्या क्षेत्रात आइन्स्टाईन यांच्या सापेक्षता सिद्धांताइतकीच महत्त्वाची ठरली. या योगदानाबद्दल त्यांना वयाच्या अवघ्या ३५ व्या वर्षी, १९५७ साली त्यांना भौतिकशास्त्रासाठीच्या नोबेल पुरस्कारानं सन्मानित केलं गेलं होतं.