छट पूजेच्या महापर्वानिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशभरासह जगभरातल्या भाविकांना हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. या पूजेचं सांस्कृतिक महत्व दिवसेंदिवस वाढत असून हा उत्सव साधेपणा आणि संयमाचं प्रतीक असल्याचं प्रधानमंत्र्यांनी समाज माध्यमांवरच्या संदेशात म्हटलं आहे. आजपासून सुरु होणाऱ्या छट पूजा उत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे मंत्रालयानं सहा हजारांहून अधिक विशेष रेल्वे गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. आजपासून नऊशे पेक्षा अधिक गाड्या धावतील, असं मंत्रालयानं सांगितलं आहे.
Site Admin | October 25, 2025 2:58 PM
छठ पूजेनिमित्त रेल्वे मंत्रालयाचा विशेष रेल्वे गाड्या चालवण्याचा निर्णय