August 20, 2025 9:03 PM

printer

छत्तीसगडमधे २९ नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण

छत्तीसगडच्या दंतेवाडा आणि नारायणपूर जिल्ह्यांमध्ये १० महिला नक्षलवाद्यांसह एकंदर २९ नक्षलवाद्यांनी आज आत्मसमर्पण केलं. त्यांच्यावर सुमारे ५५ लाख रुपयांचं इनाम होतं. राज्य सरकारच्या पुनर्वसन धोरणानुसार आत्मसमर्पण केलेल्या प्रत्येक नक्षलवाद्याला ५० हजार रुपये इतकी रक्कम प्रोत्साहन निधी म्हणून दिली गेली. सरकार त्यांना कौशल्य विकास आणि शेतीचं प्रशिक्षणही देणार आहे.