छत्तीसगडमधल्या सुकमा जिल्ह्यात आज २६ नक्षलींनी आत्मसमर्पण केलं. यातल्या १३ जणांवर एकूण ६५ लाख रुपयांचं बक्षीस होतं. छत्तीसगडच्या पुनर्वसन योजने अंतर्गत या नक्षलींनी पोलीस आणि सीआरपीएफ अधिकाऱ्यांसमोर शरणागती पत्करल्याचं पोलीस अधीक्षक किरण चव्हाण यांनी सांगितलं. हे नक्षली पीपल्स लिबरेशन गुरिल्ला आर्मीचे सदस्य होते, ओदिशा आणि आंध्रप्रदेशातल्या अनेक कारवायांमधे त्यांना सहभाग होता. या सर्वांना प्रत्येकी ५० हजार रुपये तसंच पुनर्वसन धोरणानुसार मदत दिली जाईल, असं चव्हाण यांनी सांगितलं. छत्तीसगडच्या धमतारी जिल्ह्यात कालही एका नक्षली महिलेनं आत्मसमर्पण केलं. तिच्यावर ५ लाख रुपयांचं बक्षीस होतं.
Site Admin | January 7, 2026 1:46 PM | Chattisgarh Maoists Surrendered
छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात आज २६ नक्षलींचं आत्मसमर्पण