छत्तीसगडमध्ये दंतेवाडा इथं आज ७१ माओवाद्यांनी सुरक्षा दलांपुढं आत्मसमर्पण केलं. यात २१ महिलांचा समावेश आहे. यातल्या ३० नक्षलवाद्यांवर एकूण ६४ लाख रूपयांचं बक्षिस सरकारनं जाहीर केलं होतं. या भागातल्या विविध नक्षलवादी कारवायांमध्ये त्यांचा सहभाग होता. दंतेवाडा जिल्ह्यात राबवल्या जात असलेल्या “लोने वर्रतू” अर्थात “घरी परत या” या मोहिमेअंतर्गत या सर्वांनी आत्मसमर्पण केलं आहे. राज्य सरकारच्या पुनर्वसन धोरणांतर्गत त्यांना प्रत्येकी ५० हजार रूपये तसंच कौशल्य विकास प्रशिक्षणासह इतर सुविधा दिल्या जातील असं पोलिसांनी सांगितलं.
Site Admin | September 24, 2025 8:32 PM
छत्तीसगडमध्ये दंतेवाडा इथं ७१ माओवाद्यांचंआत्मसमर्पण