छत्तीसगडच्या बस्तर इथं आजपासून तीन दिवस बस्तर ऑलिम्पिक स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेचं उद्घाटन मुख्यमंत्री विष्णुदेव साय करतील.
ऑलिम्पिक पदकविजेती मुष्टियोद्धा मेरी कोम आज या कार्यक्रमात सहभागी होईल. स्पर्धेचा समारोप केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते १३ डिसेंबरला होणार आहे. प्रसिद्ध फुटबॉलपटू, भारतीय संघाचा माजी कर्णधार बायचुंग भुतिया या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे.