छत्तीसगड, मध्य प्रदेश, ओडिशा आणि विदर्भाच्या काही भागात थंडीची लाट येण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. अंदमान आणि निकोबार बेटे, तामिळनाडू पुडुचेरी आणि कराईकल इथं काही ठिकाणी वादळ आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.
पुढील चार दिवस आसाम, मेघालय, हिमाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर, मिझोरम, त्रिपुरा आणि ओडिशा इथल्या काही ठिकाणी दाट धुक्याची परिस्थिती राहण्याचा अंदाज वर्तवला आहे.