छत्तीसगडमधे मतदारयाद्यांचं सखोल पुनरीक्षण प्रक्रिया सुरू आहे. या अंतर्गत ४ नोव्हेंबरपासून राज्यातल्या ९९ टक्के नागरिकांना नोंदणी अर्ज देण्यात आले आहेत.
बीएलओ अर्थात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी प्रत्येक मतदारसंघात अर्ज द्यायला आणि जमा करायला जात आहेत. तसंच जमा केलेल्या अर्जांचं डिजिटायशेन केलं जात असून आतापर्यंत २७ लाख अर्जांचं डिजिटायजेशन करण्यात आलं आहे.