छत्तीसगडमधल्या गरियाबंद जिल्ह्यातल्या मैनपूर भागात आज सुरक्षादलांबरोबर झालेल्या चकमकीत १० नक्षलवादी ठार झाले. मृतांमध्ये सुमारे १ कोटी रुपयांचं बक्षीस असलेला नक्षलवादी संघटनेचा कमांडर मनोज याचाही समावेश आहे. या भागातल्या जंगलात मोठया संख्येनं नक्षलवादी असल्याची माहिती मिळाल्यावर सुरक्षादलानं शोध मोहीम सुरु केली होती.
अशाच एका मोहिमेत, सुरक्षादलानं छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्याच्या विविध भागातून २६ नक्षलवाद्यांना अटक केली. यापैकी ६ नक्षलवाद्यांवर सुमारे १३ लाख रुपयांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं होतं. या नक्षलवाद्यांकडून स्फोटकं आणि शस्त्रास्त्र जप्त करण्यात आली.
छत्तीसगडच्या नारायणपूर जिल्ह्यात आज समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील होण्यासाठी १६ नक्षलवाद्यानी पोलीस अधीक्षकांसमोर आत्मसर्पण केलं. राज्य सरकारनं या सर्वांना प्रोत्साहन निधी म्हणून ५० हजार रुपयांची मदत दिली.