छत्तीसगड मधे नारायणपूर जिल्ह्यात काल सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत सहा माओवादी ठार झाले. राज्याचे पोलिस महानिरीक्षक पी. सुंदरराज यांनी दिलेल्या माहितीनुसार, माओवाद्यांविषयी माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांच्या संयुक्त पथकांनी काल दुपारी अबुझमाडच्या जंगलात कारवाई केली. चकमकीत ठार झालेल्या सहा माओवाद्यांचे मृतदेह मिळाले असून, घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रं जप्त करण्यात आली आहेत.
Site Admin | July 19, 2025 1:12 PM | chattisgad
छत्तीसगड : नारायणपूर जिल्ह्यातील चकमकीत ६ माओवादी ठार
