ठाणे भिवंडी इथं छत्रपती शिवाजी महाराज मंदिराचं लोकार्पण

छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याशी संबंधित स्थळांचा विकास करुन, त्यांच्या कार्याची प्रेरणा आपण घेत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ठाणे जिल्ह्यातल्या भिवंडी इथं आज छत्रपती शिवाजी महाराज मंदिराचं लोकार्पण केल्यानंतर ते बोलत होते. ही स्थळं आहेत, म्हणून आपल्यामध्ये स्वाभिमान असल्याचं सांगून मुख्यमंत्र्यांनी, या स्थळांच्या विकासासंबंधी माहिती दिली. या मंदिराला तीर्थस्थळाचा दर्जा देण्याची घोषणा करतानाच मुख्यमंत्र्यांनी, या मंदिराच्या विकासासाठी शासनाकडून सर्व प्रकारचं सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.