राज्यभरात जय शिवाजी, जय भारत पदयात्रेचे आयोजन

राज्य शासनानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्तानं जय शिवाजी, जय भारत या पदयात्रेचं आयोजन केलं आहे. उद्यापासून त्याचा प्रारंभ होणार आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून या पदयात्रेचं उद्घाटन करतील. संपूर्ण राज्यात ३६ जिल्ह्यांमध्ये पदयात्रांचं आयोजन करण्यात आहे. पुणे जिल्ह्यातल्या पदयात्रेत केंद्रीय मंत्री डॉ. मनसुख मांडवीय आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस सहभागी होणार आहेत. ही पदयात्रा पुणे अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या पटांगणापासून ते फर्ग्युसन महाविद्यालयापर्यंत काढली जाईल. 

 

तसंच, राज्यभरातले शिवरायांचे पुतळे आणि ऐतिहासिक स्थळांवर स्वच्छता मोहीम, शिवचरित्रावर व्याख्यानं तसंच विविध सांस्कृति कार्यक्रमांचं आयोजन या निमित्तानं केलं जाणार आहे. 

 

मालवणमध्ये उद्या राजकोट किल्ल्याच्या परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याच्या कामाची पायाभरणी पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते होणार आहे.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.