छत्रपती संभाजीनगर इथल्या विद्यादीप बालगृहातल्या ९ मुली निघून गेल्याच्या घटनेची राष्ट्रीय महिला आयोगानं दखल घेतली आहे. राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी पोलीस महासंचालकांना यासंदर्भात पत्र लिहिलं आहे. याप्रकरणाची चौकशी करुन दोषींवर कारवाई करावी असे निर्देश त्यांनी दिले आहेत. ३० जून रोजी या मुली पळून गेल्या होत्या. त्यापैकी ७ मुलींना दामिनी पथकांनं सापडल्या आहेत.
Site Admin | July 7, 2025 8:00 PM | NCW
विद्यादीप बालगृहातल्या ९ मुली निघून गेल्याच्या घटनेची राष्ट्रीय महिला आयोगाकडून दखल
