देश का प्रकृती परीक्षण अभियानात छत्रपती संभाजी नगर जिल्हा राज्यात दुसरा

आयुष मंत्रालयाच्या वतीनं देशभरात राबवण्यात आलेल्या देश का प्रकृती परीक्षण अभियानात छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यानं राज्यात दुसरा क्रमांक मिळवला आहे. या अभियानात वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत केलेल्या प्रकृती परीक्षणात छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यानं वीस हजार पेक्षा जास्त परीक्षणे नोंदवली आहेत. आयुर्वेद दिवसाच्या कार्यक्रमांमध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देश का प्रकृती परीक्षण अभियानाची घोषणा केली होती. यानुसार २५ नोव्हेंबर ते २५ डिसेंबर पर्यंत संपूर्ण देशभरात हे अभियान राबवण्यात आलं. अभियानाची सुरुवात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या प्रकृती परीक्षणानं झाली होती.